HW News Marathi
Covid-19

राज्यात काल ७८२७ नवे रुग्ण आढळले, तर ३३४० जण झाले कोरोनामुक्त

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. राज्यात काल (१२ जुलै) ७८२७ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून ३३४० बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १,४०,३२५ रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. सध्या राज्यात एकूण रुग्ण संख्या २,५४,४२७ इतकी असून, १,०३,५१६ ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 

तर दुसरीकडे, मुंबईत एका दिवसात १२६३ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ९२,७२० इतकी झाली असून ५२८५ जण दगावले आहेत. तर ६४,८७२ जण कोरोनातून बरे झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातून महाराष्ट्राच्या जनतेला केले कळकळीचं आवाहन  

News Desk

अन्यथा परप्रांतीय मजुरांप्रमाणे राज्यातील मजूरांचा प्रश्न ही गंभीर बनेल

News Desk

महापुरामुळे जिल्ह्याला कोरोना आणि साथीच्या आजारांचा विळखा- अदिती तटकरे

News Desk