HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची आज जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेत बैठक 

मुंबई | महाराष्ट्र भाजपच्या काहीच दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची आज (२७ जुलै) बैठक होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली या महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक पार पडेल. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडेल. महाराष्ट्र अनेक मुद्द्यांवरून भाजप विरुद्ध महाविकासआघाडी सरकार यांच्यात पेटत असलेले राजकारण आणि राज्यातील कोरोनाची स्थिती या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारिणीची ही बैठक महत्त्वपूर्ण ठरते.

महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ३ जुलै रोजी नव्या कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब करत कार्यकारिणीतील नाव जाहीर केली. भाजपच्या या राज्य कार्यकारिणीच्या यादीत एकूण अध्यक्षांसह १२ प्रदेश उपाध्यक्ष, ५ सरचिटणीस, १ महामंत्री संघटन, १ कोषाध्यक्ष, १२ सचिव, ७ मोर्चाचे अध्यक्ष, ७९ कार्यकारी सदस्यांचा समावेश आहे. तर विधानसभेत मुख्य प्रतोद आशिष शेलार आणि प्रतोद माधुरी पिसाळ यांची निवड करण्यात आली आहे.

भाजपची नवी कार्यकारणी

महामंत्री –

  • सुजित सिंह ठाकूर
  • चंद्रशेखर बावनकुळे
  • देवयानी फरांदे
  • रवींद्र चव्हाण
  • श्रीकांत भारतीय
  • विजय पुराणिक

उपाध्यक्ष –

  • राम शिंदे
  • जयकुमार रावल
  • संजय कुटे
  • माधव भंडारी
  • सुरेश हळवणकर
  • खासदार प्रीतम मुंडे
  • आमदार प्रसाद लाड
  • चित्रा वाघ
  • माधवी नाईक
  • खासदार कपिल पाटील
  • खासदार भारती पवार
  • जयप्रकाश ठाकुर

सचिव –

  • माजी आमदार प्रमोद जठार
  • संजय पुराम
  • अॅड. धर्मपाल मेश्राम
  • खासदार रक्षा खडसे
  • संदीप लेले
  • स्नेहलता कोल्हे
  • दयानंद चोरगे
  • इंद्रिस मुलतानी
  • अमित गोरखे
  • नागनाथ निरोवदे
  • राजेंद्र बकाने
  • अर्चना तेहटकर
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे” कुसुमाग्रजांना स्मरून राज ठाकरेंचे महाराष्ट्राला आवाहन

News Desk

सत्तेची मस्ती अधिक काळ टिकत नाही हे पंतप्रधान मोदींनी विसरु नये -सुशीलकुमार शिंदे

News Desk

बाबरीच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा आनंद काय घेताय? – संजय निरुपम

News Desk