HW News Marathi
महाराष्ट्र

Maharashtra Budget 2021-22 : समृद्धी महामार्ग, नाशिक-मुंबई मार्गावर मेगा इलेक्ट्रीक चार्जिंग सेंटर उभारणार

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार मांडत आहेत. कोरोना आणि लॉकडाउनमुळे राज्यासमोर आर्थिक आव्हान उभी आहेत. कोरोनामुळे उत्पन्नावर परिणाम झाल्याने राज्याला यंदा खुल्या बाजारातून मोठ्या प्रमाणावर निधी उभा करावा लागला. त्यामुळे राज्य सरकार या परिस्थितीवर करण्यासाठी काय करणार यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. महिलांसाठी आज महिला दिनाच्या निमित्ताने खास तरतूगी करण्यात आल्या आहेत.

अजित पवारांनी मांडला अर्थसंकल्प

  • समृद्धी महामार्ग, नाशिक-मुंबई मार्गावर मेगा इलेक्ट्रीक चार्जिंग सेंटर उभारणार
  • उद्योग विभागासाठी ३५०० कोटी रुपये
  • २५ हजार मेगावॅटचे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारणार
  • ऊर्जा विभागासाठी ९ हजार कोटी रुपयांची तरतूद
  • मुंबई पूर्व,पश्चिम द्रुतमार्गालगत सायकलिंग मार्ग उभारणार
  • मुंबईत सांडपाण्यासाठी १९,५०० कोटी रुपये
  • मिठी नदी प्रकल्पासाठी यंदा ४०० कोटी रुपये
  • नगरविकास विभागाला ८४२० कोटी रुपये मंजूर
  • खादी ग्रामोद्योग विभागासाठी ७० कोटी रुपये
  • मुंबईत रेल्वे रुळांवरील ७ उड्डाणपूल उभारणार
  • शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प २०२२ला पूर्ण करणार
  • वरळी ते शिवडी पूलाचे काम ३ वर्षात पूर्ण करणार
  • मुंबई, ठाणे, नवी मुंबईत जलमार्गाचा वापर वाढवणार
  • वसई ते कल्याण जलमार्ग सुरु करणार
  • कोलशेत, काल्हे, डोंबिवली, मीरा भाईंदरला जेट्टी उभाणार
  • मुंबईतील १४ मेट्रोलाईनचे १ लाख ४० हजार कोटी खर्च अपेक्षित
  • मेट्रो मार्ग २ अ, ७ चे काम २०२१ पर्यंत पूर्ण करणार
  • मुंबईतील कोस्टल मार्ग २०२४ पर्यंत पूर्ण करणार
  • बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या खर्चासाठी यंदा ४०० कोटी
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने देशात बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न फसला! – उद्धव ठाकरे

Aprna

‘शिवतीर्था’वर ऐकू येणार मोदींचा आवाज; राज ठाकरेंना मुनगंटीवारांकडून स्पेशल गिफ्ट

Manasi Devkar

“तुम्हाला अजून किती बलात्कार आणि विनयभंग पाहिजेत”, फडणवीस अजित पवारांवर भडकले  

News Desk