HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, ‘आरे’ मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती !

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज (२९ नोव्हेंबर) मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री मोठी निर्णय घेतला आहे. आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. मात्र, मेट्रोच्या कामला स्थगिती दिली नाही, असे देखील मुख्यमंत्र्यांनी नमुद केले आहे. जोपर्यंत या कामाची चौकशी होऊन पर्यायी मार्ग निघत नाही तोपर्यंत आरेतले आता एक पानही तोडले जाणार नाही, असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मेट्रोच्या कारशेडसाठी रातोरात आरेतील झाडांची कत्तल मंजूर नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे जोपर्यंत पुढचे निर्देश येईपर्यंत काम होणार नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे पर्यावरण प्रेमींना दिलासा मिळाला आहे. तसेच शेतकऱ्यांना दिलेल्या शब्द मी पाळणार, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. पत्रकारांनी सरकारचे नाक, कान, डोळे झाले पाहिजे, असे आवाहन विधिमंडळ वार्ताहर संघात पत्रकारांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर परंपरेनुसार विधिमंडळ वार्ताहर संघात जाऊन पत्रकारांशी संवाद साधला. माझ्या माहितीप्रमाणे कदाचित मुंबईत जन्मलेला,वाढलेला महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री मीच आहे. त्यामुळे मुंबईसाठी आणखी काही वेगळे करता येईल का, अशी विचारणार मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना केली. त्याबरोबर महाराष्ट्रातील शहरांच्या विकासासाठीही मी तेवढाच विचार करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आता जेवढी झाडे राहिली आहेत, ती तशीच राहतील. या झाडांपैकी एकही झाड पडणार नसून त्या झाडांचे पानही कुणी तोडणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आरे कारशेडसाठीच्या जंगलतोडीला स्थगिती दिल्याचे सांगितले.

आरे कारशेडच्या कामाला स्थगिती

मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्यात आली. त्यानंतर सत्ता आल्यानंतर आरेतील जंगलामध्ये असलेल्या झाडांवर कुऱ्हाड चालवणाऱ्यांना बघू, असा इशारा ही मुख्यमंत्र्यांनी दिला होता. तसेच, सत्तेत आल्यानंतर आरेला जंगल करू असे आश्वासन शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिले होते. मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच शिवसेना भवनाबाहेर पर्यावरण प्रेमींनी ‘आरे बचाव’ असे पोस्टर हातात घेऊन उभे होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजी भिडे गुरूजींना मुख्यमंत्री पाटीशी घालत आहेत | राजा ढाले

News Desk

मुंबई, पुणे, नागपूर ही शहरे अत्यावश्यक सेवा वगळता बंद

swarit

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत भाजप नेत्याची अवहेलना

News Desk