HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज ५,३६८ नवे रुग्ण आढळले, २०४ जणांचा झाला मृत्यू

मुंबई | राज्यात आज (६ जुलै) ५,३६८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २०४ जणांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ लाख ११ हजार ९८७ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ३,५५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १५ हजार २६२ इतकी झाली आहे. तर राज्यातील रिकव्हरी रेट हा ५४.३७ इतका झाला आहे.

सध्या राज्यात ६ लाख १५ हजार २६५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४६ हजार ३५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आत्तापर्यंत पाठवण्यात आलेल्या ११ लाख ३५ हजार ४४७ नमुन्यांपैकी २ लाख ११ हजार ९८७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Related posts

“उद्धव ठाकरेंनी निर्लज्ज राजकरण थांबवावं”, पियूष गोयल यांची मुख्यमंत्र्यांवर गंभीर टीका

News Desk

“निवडणूक आयोग त्याच मेलेल्या हत्तीचे नातेवाईक आहेत”

News Desk

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा ! रामदास आठवलेंची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे मागणी

News Desk