HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात २४ तासांत ६० कोरोना पॉझिटिव्ह, राज्याचा आकडा १०७८ वर

मुंबई | महाराष्ट्रात २४ तासांत ६० नव्या कोरोनाबाधितांची भर झाली आहे. मुंबईत नव्याने ४४, पुणे ९, नागपूर ४ नगर, अकोला, बुलढाण्यात प्रत्येकी १ रुग्ण सापडला आहे. दरम्यान, चिंतेची बाब म्हणजे मुंबईचा आकडा ६८६ वर पोहोचला अससून महाराष्ट्राचा आकडा १०७८ झाला आहे. ही अत्यंत धक्कादायक आणि चिंता वाढवणारी बाब आहे.

दरम्यान आज (८ एप्रिल) धारावीत पुन्हा २ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामूळे धारावीत आता कोरोनाग्रस्तांची संख्या ९ वर पोहोचली आहे. तर, माहिमध्ये पहिल्यांदाच २ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. धारावीत दिवसागणिक वाढणारी कोरोनाची संख्या आरोग्ययंत्रनेत चिंता वाढवत आहे. माहिममध्ये कोरोनाचे रुग्ण ज्या भागात सापडले त्यांचा भाग पोलीसांकडून सील करण्यात आला आहे १४ एप्रिलला देशातला जरी लॉकडाऊन संपला तरी मुंबई आणि पुण्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेत सरकार काय निर्णय घेईल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘वेड्यावाकड्या घोषणा करणार नाही आणि केंद्राकडे वेडीवाकडी मागणीही करणार नाही’

News Desk

ओबीसींच्या आरक्षणावरून फडणवीसांचा भुलभुलैय्या, छगन भुजबळांनी केली टीका

News Desk

ऐरोली-काटई नाका रस्ता प्रकल्पातील पारसिक डोंगरातील डावा बोगदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खुला

Aprna