मुंबई | कोरोनाचं संकट काही अंशी कमी झालं असलं तरी अद्याप टळलं नसल्यानं राज्य सरकारनं झोनमधील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील कंटेनमेंट झोनमध्ये येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहे. राज्य सरकारनं याबाबात परिपत्रक जारी केले आहे.
लॉकडाऊन वाढवताना राज्य सरकारनं यापूर्वी वेळोवेळी जारी केलेले आदेश लागू असतील. गेल्या ३० सप्टेंबर आणि १४ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आले होते. यात परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत. मात्र, कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन कायम ठेवला जाणार आहे.
नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खालील सूचनांचं पालन करणं आश्यक आहे.
सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक
सामाजिक अंतर राखणं गरजेचं
सतत हात धुणे आवश्यक
Maharashtra government extends #lockdown till February 28.
"Activities already allowed and permitted from time to time shall be continued and all earlier orders shall be aligned with this order and shall remain in force up to 28
February," reads statement.— ANI (@ANI) January 29, 2021
दरम्यान, केंद्राकडूनही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन करण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. तर कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी द्यावी. तसेच कंटेन्मेंट झोन मार्किंग करण्यात यावे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.