HW News Marathi
Covid-19

#NisargaCyclone : आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभाग सज्ज, तर पालघर जिल्ह्यात एनडीआरएफ टीम दखल

मुंबई | कोरोना संकटाबरोबरच आता महाराष्ट्रात निसर्ग चक्रीवादळाचे नैसर्गिक आपत्तीचेही संकट समोर उभे ठाकले आहे. मात्र, निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तयारी केली आहे. मुंबईत येत्या २ दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पालघर जिल्ह्यात एनडीआरएफ टीम दाखल झाली असून त्यांनी सध्याच्या परिस्थितीचा आढवा घेत आहेत.

निसर्ग चक्रीवादळ ३ जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळास तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मच्छिमारांनाही समुद्रातून बोलावून घेण्यात आले असून जीवित हानी होणार नाही हे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

या चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करण्यासाठी चक्रीवादळाचा फटका ज्या जिल्ह्यात बसू शकतो त्या जिल्ह्यात एक एनडीआरएफ टीम बोलवण्यात आली आहे. रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यात एनडीआरएफ टीम दाखल झाली आहेत. चक्रीवादळामुळे समुद्रात गेलेल्या बोटींना परत बोलवण्यात आल्या आहेत. पुढची सूचना येईपर्यंत बोटी समुद्रात जाऊ शकणार नाही. नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवब्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

गृहमंत्र्यांसोबत चक्रीवादळासंदर्भात चर्चा

तसेच निसर्ग चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर काल (२ जून) गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओद्वारे चर्चा करून या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री बोलताना म्हणाले, वेळ पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्याही तयार ठेवण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या व्यक्ती कच्च्या घरांत राहत आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबत दवंडी व लाऊडस्पीकर द्वारे सांगण्यात आले आहे. यासाठी पक्की निवारा गृहे देखील तयार ठेवण्यात आली आहेत. मच्छीमारांना समुद्रातून बोलविण्यात आले असून तटरक्षक दलाला देखील सुचना देण्यात आली आहे. वादळामुळे झाडे पडणे, भूसख्खलन, जोरदार पाऊस यामुळे हानी होण्याची शक्यता घेऊन प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील विशेषत: सखल भागातील झोपडपट्टीवासियांना देखील स्थलांतरित करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

एनडीआरएफ, एसडीआरएफ तैनात

या चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या १६ तुकड्यांपैकी १० तुकड्या तैनात करण्यात आल्या असून एसडीआरएफच्या ६ तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेषत: वीज पुरवठा खंडीत होणार नाही तसेच पालघर आणि रायगड मधील रासायनिक कारखाने, अणू ऊर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. मंत्रालयात देखील २४ तास नियंत्रण कक्ष सुरु असून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांसमवेत या व्हीसीसाठी मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव मदत व पुनर्वसन किशोर राजे निंबाळकर तसेच इतर सचिव उपस्थित होते.

नॉनकोविड रुग्णालये उपलब्ध

मदत व बचाव कार्य करताना कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच नॉनकोविड रुग्णालये उपलब्ध करण्याचे निर्देश दिल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले. कोविडसाठी तात्पुरते उभारण्यात आलेल्या रुग्णालयांतील रुग्णांना देखील सुरक्षित स्थळी कसे हलविता येईल ते पाहण्यास सांगण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास अधिक रुग्णालये उपलब्ध करणे व त्याठिकाणी जनरेटर्सची सुविधा करण्यासही सांगण्यात आले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय होणार” अजित पवारांचे बैठकीपूर्वी सूचक विधान!

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ निर्णयाबद्दल एकता कपूर यांनी मानले आभार

News Desk

पुणेकरांना दिलासा! सोमवारपासून मॉल्स उघडणार तर दुकाने ७ पर्यंत सुरु राहणार 

News Desk