HW News Marathi
Covid-19

आज राज्यात १९ हजारांहून अधिक रुग्ण ‘कोरोनामुक्त’

मुंबई | महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज (२९ सप्टेंबर) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल १४ हजार ९७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दिलासादायक म्हणजे, गेल्या २४ तासांत १९ हजार २१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेततर याच एका दिवसात राज्यात ४३० रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत तब्बल १३ लाख ६६ हजार १२९ एकूण कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ६९ हजार १५९ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले असून ३६ हजार १८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात सद्यस्थितीत २ लाख ६० हजार ३६३ रुग्ण विविध रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तासगावच्या द्राक्ष उत्पादकांसाठी जयंत पाटील यांचा अनोखा पॅटर्न

News Desk

लसीकरण फसल्यामुळे मोदींच्या अपयशावर पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रयत्न, नाना पटोलेंचा घणाघात

News Desk

कंटेन्मेंट झोनमधील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश, केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स जारी

News Desk