Site icon HW News Marathi

कोविडची मोफत बूस्टर मात्रा : महाराष्ट्रात अंमलबजावणी करणार

मुंबई |  देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना शुक्रवारपासून (15 जुलै) पुढील 75 दिवस कोविडचा बूस्टर डोस(वर्धक मात्रा) मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या मोहिमेची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना काल (13 जुलै) दिली.

या देशव्यापी मोहिमेसंदर्भात आपली प्रधानमंत्र्यांशी आज चर्चा झाली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी आरोग्य विभागास निर्देश दिले की, या मोहिमेमध्ये एकही दिवस वाया जाऊ न देता सर्व संबंधितांना बूस्टर मात्रा मिळालीच पाहिजे यासाठी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, आरोग्य संस्था यांनादेखील सहभागी करून घ्यावे. याविषयी पुरेशी जनजागृती करावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Exit mobile version