HW News Marathi
Covid-19

नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला, महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट ८९.९९%

मुंबई | राज्यातील दररोज होणारी नव्या कोरोनाबाधितांची संख्या आता नियंत्रणात आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (३१ ऑक्टोबर) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५४८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात ७ हजार ३०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

राज्यासाठी दिलासादायक बाब अशी कि, आतापर्यंत राज्यात एकूण तब्बल १५ लाख १० हजार ३५३ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत राज्यात कोरोनाचे एकूण १ लाख २३ हजार ५८५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही सातत्याने वाढ होत असून ८९.९९% इतके झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरातमध्ये स्मशानात मृतदेहांची चेंगराचेंगरी सूरू, महाराष्ट्राने यातून धडा घ्यावाच! – सामना

News Desk

पंतप्रधान मोदी आज उद्धव ठाकरे यांच्यासह १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना स्थितीवर करणार चर्चा

News Desk

लडाखमध्ये तणाव, चीनने भारतीय सैन्यांना घेतले होते ताब्यात

News Desk