HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

दिलासादायक ! महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आता ८९.५३% वर  

मुंबई | राज्यातील कोरोनास्थिती हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज (२८ ऑक्टोबर) जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार ४३० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात तब्बल ८ हजार ४३० जण कोरोनमुक्त झाले आहेत. त्यामुळे, आतापर्यंत राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १४ लाख ८६ हजार ९२६ इतकी आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट देखील आता ८९.५३ टक्क्यांवर पोहचला आहे.
https://twitter.com/ANI/status/1321456617976557571?s=20

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण आकडा आता १६ लाख ६० हजार ७६६ वर पोहोचला आहे. तर गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनामुळे आपला जीव गमावलेल्यांचा एकूण आकडा ४३ हजार ५५४ वर पोहोचला आहे. दुसरीकडे सद्यस्थितीत राज्यात १ लाख २९ हजार ७४६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही अधिकृत आकडेवारी जारी केली आहे.

Related posts

कर्नाटकातील धारवाडमध्ये निर्माणाधीन इमारत कोसळली, अनेक जण अडकले

News Desk

रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपयांची मदत तोकडी ठरेल

News Desk

“काय रे, अलिबागवरून आलायस का?”, असे कोणालाही विचारू नका

News Desk