HW News Marathi
देश / विदेश

२६ जूनचा ‘चक्का जाम’ ताकदीनिशी यशस्वी करा ! पंकजा मुंडेंचे ऑनलाईन बैठकीत आवाहन

बीड | राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवले आहे. सरकारच्या या नाकर्तेपणाच्या विरोधात येत्या २६ जून रोजी भाजपच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलनात ओबीसी बांधवांनी मोठया संख्येने सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले आहे. ‘चक्का जाम’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आज (२२ जून) भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन आंदोलनाच्या नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.

पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या कि, “ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होणे हे दुर्दैवी आहे. केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणा व नाकर्तेपणामुळे ही वेळ आली आहे. आरक्षण आपल्याला पुन्हा मिळवावे लागेल. सरकारचा धिक्कार करण्यासाठी आणि आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूका होऊ देणार नाहीत हा नारा घेऊन आपण २६ जूनच्या रास्ता रोको आंदोलनात ताकदीनिशी उतरायचे आहे. आतापर्यंत वेगवेगळी आंदोलने आपण यशस्वी केली आहेत, हे आंदोलनही यशस्वी करायचे आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधींनी पदाधिकारी, कार्यकर्ते व ओबीसी बांधवांसह आंदोलनात सहभाग घेऊन जिल्हा दणाणून सोडावा”, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

खासदार डॉ.प्रितम मुंडे यावेळी बोलताना म्हणाल्या, मी स्वतः आंदोलना वेळी जिल्हयात असणार आहे. आंदोलनात मोठया ताकदीने उतरायचे आहे, त्यासाठी नियोजन करावे असे आवाहन केले. बीड जिल्हयातील भाजप नेत्यांच्या या बैठकीला खासदार डॉ.प्रितम मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार, आमदार नमिता मुंदडा, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजी आमदार भीमसेन धोंडे, आर टी देशमुख, रमेश आडसकर, मोहन जगताप, अक्षय मुंदडा, प्रवक्ते राम कुलकर्णी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, ओबीसी मोर्चाचे डाॅ. लक्ष्मण जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वातंत्र्यदिनी चीनची भारतीय सीमारेषेत घोसखोरी,आयटीबीपीच्या अहवालात माहिती

Gauri Tilekar

इंधन कपातीचा दिलासा तात्पुरता होता का ?

News Desk

अखेर राहुल गांधींनी सांगितलं मोदींची गळाभेट घेण्याचं कारण

News Desk