HW News Marathi
देश / विदेश

आरजे मलिष्कावर भारतीय भडकले! नेमकं काय झालं?

नवी दिल्ली | टोक्यो ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळवलेल्या नीरज चोप्राचं देशभर कौतुक होत आहे. अनेक लोकं त्याची मुलाखत घेऊन त्याच्या यशाची गाथा ऐकायला उत्सुक आहेत. नीरज चोप्राची खास मुलाखत आरजे मलिष्काने घेतली होती. पण या मुलाखतीनंतर आता भारतीय चाहते तिच्यावर चांगलेच भडकलेले आहेत. त्याचबरोबर काही चाहत्यांनी तर यावेळी, तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत, असेही उद्गार काढले आहेत.

नेमकं काय घडलं?

नेरज चोप्राचा आरजे मलिष्का सोबतचा मुलाखतीचा विडिओ सध्या व्हायरल होत आहे. या मुलाखतीचे व्हिडिओ मलिष्काने आपल्या अकाउंटवरून शेअर केले. मुलाखतीला सुरवात करण्याअगोदर त्यांनी नीरजसमोर डान्स केला. आणि मुलाखत संपवताना मलिष्काने नीरजला जादू की झप्पी देण्याची मागणी केली. तिच्या या मुलाखतीवर सध्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र काही नेटकरी सध्या प्रचंड भडकले आहेत.

लैंगिक छळ असा उल्लेख केला गेला

मलिष्का आणि तिच्या सहकाऱ्यांचं वागणं हे लाजिरवाणं होतं, नीरजला काय काय सहन करावं लागत आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी नोंदविल्या आहेत. आतापर्यंत १४ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, आपल्या सुवर्णपदक विजेत्याला कोणत्या मूर्खपणाचा सामना करावा लागत आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं आहे की, खूप लाजिरवाणं वागणं आहे. नीरजच्या जागी महिला खेळाडू असते आणि पुरुषांनी अशा प्रकारचा डान्स केला असता, तर त्याचा लैंगिक छळ असा उल्लेख केला गेला असता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहशतवाद्यांना मदत करणा-या सात जणांना अटक

News Desk

Tarun Sagar Died | राष्ट्रसंत तरुण सागर यांच्याविषयी तुम्हाला हे माहित आहे का ?

News Desk

तेलंगणा विधानसभा मुदतीपूर्वीच बरखास्त करण्याची राज्यपालांकडे शिफारस

News Desk