HW News Marathi
देश / विदेश

‘पश्चिम बंगालमध्ये कोरोना स्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता’, ममता बॅनर्जींची पंतप्रधानांना पत्रातून माहिती

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा लसीविषयी तक्रार केली आहे. कोरोनाला रोखायचं असेल तर मग लसीकरण हा एकंच उपाय आहे. परंतु लस पुरात नसल्याची तक्रार ममता बॅनर्जी यांनी केली आहे. एवढेच नाही, तर पश्‍चिम बंगालला कोरोना लसीच्या जवळपास 14 कोटी डोसची आवश्यकता आहे, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

बंगालमध्ये पुन्हा रुग्णांची संख्यावाढ

पश्चिम बंगाल मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये बुधवारी कोरोनाचे 826 नवे रुग्ण आढळून आले असून 10 जणांचा मृत्यू झाला. तसेच राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 15,30,850 रुग्ण आढळून आले आहेत. तर 18,180 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत, आज(५ ऑगस्ट) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ग्लोबल अॅडव्हायजरी बोर्डाची बैठक घेतली. यावेळी नोबेल विजेते अभिजित बॅनर्जीही उपस्थित होते. बैठकीनंतर मुख्यमंत्री ममता म्हणाल्या, या वर्षाच्या अखेरीस दुर्गा पूजेच्या सुट्ट्यांनंतर आम्ही एक दिवस आड शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहोत.

हे संपूर्ण देशाला लागू आहे

“सर्वात मोठी समस्या ही आहे की केंद्र सरकार संपूर्ण देशाला पुरेसा ठरेल इतकं लसींचं उत्पादन आणि पुरवठा करण्यास असमर्थ आहे. जर लसींचा पुरेसा साठा असता, तर लस तुटवड्यासंदर्भात सध्या होत असलेल्या तक्रारी झाल्या नसत्या. आज संपूर्ण देशातच लसीचा सांगण्यात आलेला साठा पुरवला जात नाहीये”, असं अभिजीत बॅनर्जी यांनी नमूद केलं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या समितीची आज बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिश्चित काळासाठी ‘समझौता एक्सप्रेस’ रोखण्याचा पाकिस्तानचा निर्णय

News Desk

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचा १ जवान शहीद तर ४ जखमी

News Desk

के. जी. बोपय्या यांच्या अध्यक्षतेखाली बहुमताची चाचणी

News Desk