HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई भाजपच्या अध्यक्ष पदी मंगलप्रभात लोढा यांची निवड

मुंबई | भाजपचे मुंबई अध्यक्ष पदी मंगलप्रभात लोढा यांची वर्णी लागली आहे. तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लोढा यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी दिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोढा यांच्याकडे ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.

लोढा यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष होते. लोढा यांनी दक्षिण मुंबईतील मलबार हिल विधानसभा मतदार संघाचे देखील प्रतिनिधित्व करत आहेत. मंगल प्रभात लोढा हे महाराष्ट्र प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष होते. दक्षिण मुंबईतील मलबार हिल विधानसभा मतदार संघाचे ते प्रतिनिधित्व करत आहेत. तसेच लोढा हे मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आहेत. लोढा यांची नियुक्ती होण्यापूर्वी मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे होती. परंतु, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शेलारांचा समावेश झाला.आशिष शेलार यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढ मिळाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचीही स्वबळाची तयारी सुरु आणि भविष्यातही शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहील – अब्दुल सत्तार

News Desk

खासदार वनगा यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

News Desk

बालेकिल्ल्याला मिळाली फक्त दोन मंत्रिपदे….

News Desk