HW News Marathi
महाराष्ट्र

मनसैनिक म्हणतात,’राजसाहेब मी तुमचा तानाजी’

पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले अधिवेशन येत्या २३ जानेवारीला मुंबईमध्ये होणार आहे,त्या पार्श्वभुमिवर मनसैनिकांनी तयारीला सुरूवात केली आहे. कार्यक्रमाची तयारी सुरू आहेचं,परंतु मनसैनिकांनी एक वेगळी मोहिम हाती घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत फारशी समाधानकारक कामगिरी करू न शकल्यामुळे आणि महाविकासाघाडीची सत्ता स्थापन झाल्यामुळे मनसे आणि राज ठाकरे यांची नेमकी भुमिका काय असा प्रश्न संपुर्ण महाराष्ट्राला पडला आहे. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या २३ तारखेला मिळतील असं मनसेैनिकांकडून सांगण्यात येत आहे.

या पार्श्वभूमिवर मनसैनिकांनी ट्विटरवर एक हॅशटॅग टाकत मनसे आता नव्या रूपात आणि नव्या जोशात येणार असून आपण सर्वजण राज ठाकरे यांच्या पाठीशी आहोत असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या हॅशटॅगमध्ये #राजसाहेब मी तुमचा तानाजी’ असे लिहिण्यात आले आहे. सध्या अभिनेता अजय देवगन यांचा शूरवीर तानाजी यांच्या आयुष्यावरील चित्रपट गाजत आहे. तानाजी मालुसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या जीवाची बाजी लावली होती.त्यामुळे सध्या मनसैनिकांनीसुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी आपण नेहमी त्तपर असू असा संदेश देण्याचा प्रयच्न या ट्विटरवरील हॅशटॅगच्या माध्यमातुन केला आहे. मनसे नेते किर्तीकुमार शिंदे यांनीसुद्धा ट्विट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूकीवर दगडफेक करुन दंगल प्रकरणी  ६० जणा विरुद्ध गुन्हा दाखल

News Desk

राज्यात दिवसभरात ८ हजार १९६ रुग्ण कोरोनामुक्त १५८ रूग्णांचा मृत्यू!

News Desk

राज्यात ३१ लाख ८१ हजार ७०० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

News Desk