HW News Marathi
महाराष्ट्र

Maratha Reservation | संपुर्ण राज्यभरात आज मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन

मुंबई | संपुर्ण महाराष्ट्र मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पेटला आहे. मराठा आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी दिवसेंदिवस आंदोलन अधिक तीव्र होत आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पुण्यात मराठा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला मराठा समाजातील समन्वयक, संशोधक, तज्ज्ञ, अभ्यासक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत

.

ही परिषद पुण्यात दुपारी रेसिडन्सी क्लबमध्ये होणार आहे. या परिषदेत मराठा आरक्षण आंदोलनाची पुडील दिशा ठरविण्यात येणार आहे. तसेच ९ ऑगस्टला पुकारलेल्या आंदोलनाच्या नियोजना संदर्भात देखील या परिषदेत चर्चा होणार आहे. मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी परळीत आज मराठा ठिय्या आंदोलनाचा १९वा दिवस आहे. संपुर्ण राज्यभरात मराठा समाजाचे आंदोलन सुरूच आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी आक्रमक पवित्र घेतला. यानंतर अनेक जिल्ह्यात जाळपोळ-तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमरावतीत मोठा तणाव, ‘या’ चार जिल्ह्यांतून मागविले पोलीस

News Desk

शीख समाजासाठी विवाह नोंदणी कायदा लागू असून शासकीय विभागांनी अंमलबजावणी करण्याचे नवाब मलिकांचे आदेश!

News Desk

महिलांच्या लोकल प्रवासात रेल्वे आणि भाजपचाच आडमुठेपणा-सचिन सावंत

News Desk