HW News Marathi
महाराष्ट्र

मविआचे नेते यंत्रणांच्या दबावाला घाबरणार नाहीत; नवाब मलिकांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

मुंबई। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ईडी आता पुढची कारवाई नांदेडमधील नेत्याविरोधात करणार असल्याचा अप्रत्यक्षपणे सूचक इशारा दिला. यावर आता अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीचे नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाला घाबरणार नाहीत, असं नवाब मलिक म्हणाले.

या दबावाला कुठेही झुकणार नाहीत

यंत्रणांचा वापर करुन दहशत निर्माण करण्याचं काम सुरु आहे. पण मला वाटतं नेते आता घाबरणार नाहीत. आमच्याबाबतीत आम्ही सर्व पुरावे सादर केले. आमचे जावई हे त्यांची कायदेशीर लढाई लढत आहेत. पण हे कशापद्धतीने खोट्या केसेस करत आहेत त्याचे पुरावे आम्ही सादर केले. पण भविष्यात या सरकारमधील राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे किंवा शिवसेनेचे मंत्री आता या दबावाला कुठेही झुकणार नाहीत. त्यांना तोंड देण्याच्या तयारीत आम्ही आहोत, असं नवाब मलिक म्हणाले.

नांदेडमध्ये केलेलं सूचक वक्तव्य निमित्त ठरलं

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा हस्तक्षेप वाढत असल्याचा आरोप मविआच्या नेत्यांनी वारंवार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि नेते ईडीच्या रडारवर आहेत. दरम्यान, आता काँग्रेसचे नेते ईडीच्या रडारवर येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नांदेडमध्ये केलेलं सूचक वक्तव्य निमित्त ठरलं आहे. ईडीची पुढची कारवाई नांदेडच्या नेत्यावर होणार, असा अप्रत्यक्षपणे चंद्रकांत पाटील यांनी सूचक इशारा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ शिंदे यांचा फोटो समोर ठेवत अघोरी जादू टोण्याचा प्रकार, दोन जण अटकेत

News Desk

ज्यांनी कधीही निवडणूक लढवलेली नाही त्यांनी ईव्हीएमवर बोलूच नये !

News Desk

आमची बाजू सत्याची आणि विजय आमचाच होणार !

News Desk