HW News Marathi
देश / विदेश

मेधा कुलकर्णींनी पंतप्रधानांना बांधली राखी! मागितलं ‘हे’ बक्षीस

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोथरुड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी आमदार आणि भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी यांनी राखी बांधली आहे. या भेटीत पुण्यातील लसीकरण, शनिवारवाड्याच्या जिर्णोद्धारासाठी निधी, आदी विषयांवर चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिलीय. तसंच कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांसाठीही मेधा कुलकर्णी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महत्वाची मागणी केली आहे.

काय होतं भेटी मागचं कारण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेधा कुलकर्णी यांनी दिल्लीत येथे भेट घेतली. कोरोना काळात वैधव्य आलेल्या महिलांना एकरकमी 5 लाख ₹ अथवा दरमहा 5000 ₹ वेतन देण्यात यावे यासाठी आपण राज्य सरकारांना सूचना करावी अशी विनंती मी माननीय पंतप्रधानांकडे केली. या भेटीत पुण्यातील लसीकरण, शनिवार वाड्याच्या जीर्णोद्धारासाठी निधी आदी विषय देखिल मी माननीय पंतप्रधानांसोबतच्या चर्चेत मांडले. मोदीजींनी या सर्व मुद्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला, असं ट्वीट मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे.

दिल्लीत सर नेत्यांची भेट

दिल्ली दौऱ्यात मेधा कुलकर्णी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचीही भेट घेतली. त्यावेळी त्यांनी केंद्रीय वित्तमंत्री (राज्य) डॉक्टर भागवत कराड यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. रुपी बँक संघटनेचे पत्र त्यांना देऊन लक्ष घालण्याची विनंती केली. त्यांनी या विषयात केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बरोबर चर्चा करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती त्यांनी दिलीय आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंडोमध्ये लपवले हेरॉइन

News Desk

जुलैपासून मोबाईल नंबर होणार 13 अंकी

Adil

देशात दरवर्षी २६ डिसेंबरला ‘वीर बाल दिवस’ साजरा होणार; पंतप्रधानांची घोषणा

News Desk