HW News Marathi
महाराष्ट्र

अटलजींच्या श्रद्धांजलीस विरोध करणाऱ्या नगरसेवकाला तुरुंगवास

औरंगाबाद | भारताचे माजी पंतप्रधान तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणा-या एमआयएमच्या सय्यद मतीन या नगरसेवकाला एक वर्षाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली नाही. मतीनच्या वाढत्या गुन्हेगारी आणि धोकादायक कारवायांची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

औरंगाबाद पोलिसांनी महाराष्ट्र धोकादायक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए १९८१) मतीनवर कारवाई केली आहे. मतीनची एक वर्षासाठी हर्सुलच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

बेकायदेशीर जमाव जमवणे, जाळपोळ करणे, मनुष्यहानी होईल असे कृत्य करणे, लोक सेवकांवर हल्ला करणे, सरकारी कामात अडथळा, दोन जमातींत तेढ निर्माण करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे मतीनवर आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उरणच्या खोपटा पुलावर दहशतवादी संघटनेच्या मजकूराने खळबळ

News Desk

राजकारणाची पातळी खालावली, रोज उठून पाहावे लागते, आज कोणाचा नंबर? संजय राठोड यांचा आरोप!

News Desk

प्लॅस्टर ऑफ पॅरिसवरील केंद्र सरकारने बंदी उठवावी, मुर्तीकारांची राज ठाकरेंकडे मागणी 

News Desk