HW News Marathi
महाराष्ट्र

करुणा शर्माच्या ‘त्या’ गंभीर आरोपानंतर तातडीने धनंजय मुंडेंचा नवा खुलासा

मुंबई । राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाल्याचे वृत्त थोड्याच वेळापूर्वी आले. कारण, धनंजय मुंडेंनी ज्या महिलेसोबत आपले संबंध असल्याचे मान्य केले होते त्या करुणा शर्मा यांनीच आता धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

धनंजय मुंडे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत ३ महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे. मात्र, या वृत्तानंतर आता तातडीने धनंजय मुंडे यांनी याबाबत जाहीर खुलासा केला आहे. “निव्वळ बदनामी करण्याच्या हेतुने करण्यात येत असलेल्या अशा आरोपात काहीही तथ्य नाही”, असे धनंजय मुंडे यांचे म्हणणे आहे.

करूणा शर्मांच्या तक्रारीनंतर धनंजय मुंडेंचा खुलासा

आज पुन्हा काही माध्यमात माझ्याविरुद्ध श्रीमती करुणा शर्मा यांनी पोलिसात तक्रार केल्याच्या बातम्या प्रसिद्धीस येत आहेत. याबाबत मी खुलासा करू इच्छितो की,

श्रीमती करुणा शर्मा यांचे बाबतीत मी पुर्वीच खुलासा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या विवादात मी स्वतःहून मा . उच्य न्यायालयात याचिका दाखल केली असुन त्याबाबतीत सदर खुलाशात सविस्तर नमुद केले आहे.

सदर याचिकेत मा. उच्च न्यायालयाने श्रीमती करुणा शर्मा यांना मना आदेशही दिला आहे. (इंजंक्शन)

त्यानंतर विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नेमण्याची विनंती केल्यावरून मा. उच्च न्यायालयाने मा. मद्रास उच्य न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश मा. श्रीमती ताहिलरामानी यांची मेडिएटर म्हणुन नियुक्तीसुद्धा केली आहे.

सदर मेडिएशन च्या दोन बैठक झालेल्या असुन दिनांक 13 फेब्रुवारी 2021 रोजी पुढील बैठक निश्चित झालेली आहे. या मेडिएशन मध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादासह इतर सर्व मुद्दे चर्चेत व निर्णयार्थ आहेत.

असे असताना आणि सहमतीने मा.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिवरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांसमोर मेडिएशनची प्रक्रिया सुरु असताना अश्याप्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे हेतूबद्दल शंका निर्माण करणारे आहे.

मुळात जो मुद्दा मेडिएशनमध्ये चर्चेत आहे त्याबद्दल जाहीर मागणी करणे म्हणजे समोरच्या विरोधी पक्षास न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नसुन निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणे हाच हेतु दिसुन येतो.

कृपया सदर बाब हि न्यायप्रविष्ठ असुन न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो सर्वांवर बंधनकारकच असणार आहे.

यामुळे याप्रकरणात निव्वळ बदनामी करण्याच्या हेतुने करण्यात येत असलेल्या अशा आरोपात काहीही तथ्य नाही.

कृपया ही वस्तुस्थिती व न्यायालयीन प्रकरण व एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यातील बाब लक्षात घेऊन वृत्त देताना सामाजिक जीवनातील व्यक्तीची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी ही नम्र विनंती

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मिलिंद एकबोटेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय वर्तुळात खळबळ

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षपूर्ती मुलाखत लवकरच प्रदर्शित होणार…

News Desk

राज्य आणि केंद्र सरकारचा एफआरपीचे तुकडे पाडण्याचा घाट ?

News Desk