HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडेंकडे ‘परभणी’च्या पालकमंत्री पदाची जबाबदारी

बीड | राज्याचे सामजिक न्याय व विषेश साहाय्य मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मात्र धनंजय मुंडे यांच्यावर पक्षाने आणखी एक मोठीत  जबाबदारी सोपवली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नुकताच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. परभणी आणि गोंदिया जिल्ह्याचे पालमंत्री पदाचा पदभार इतर मंत्र्यांकडे सोपविण्याचा निर्णय झाला. त्यात परभणीचे पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांच्याकडे तर गोंदियाची जबाबदारी प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील बैठकीत सध्या अटकेत असलेले राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याशी संबंधित मोठे निर्णय पक्षाने घेतले आहेत. आघाडी सरकारने मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नसला तरी देखील त्यांच्याकडे असलेल्या विभागाचा कार्यभार इतर मंत्र्यांकडे सोपविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. तसेच मलिक यांच्याकडील परभणी आणि गोंदिया या जिल्ह्यांची पालकमंत्रिपदे देखील इतर मंत्र्यांकडे सोपविण्याचा निर्ण घेतला आहे.

या निर्णयानुसार, मलिकांकडे असलेले परभणीचे पालकमंत्रिपद धनंजय मुंडे आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हे प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर पाटील हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना हा खुलासा केला. या निर्णयामुळे सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या जीमेदारीत आणखी वाढ झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांत आनंदाची लाट पसरली असून सोसिएल मेडियावर धनंजय मुंडे यांच्यावर शुभेच्छा ची वर्षा केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालघरला 28वा रस्ता सुरक्षा सप्ताह जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सुरू

News Desk

माळशेज घाटातील वाहतूक दोन दिवस बंद

swarit

“स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, त्याचं काय झालं”, थोरातांचा फडणवीसांना सवाल

News Desk