HW News Marathi
महाराष्ट्र

प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी राणा दाम्पत्यांचे सर्व प्रकार सुरू, बच्चू कडूंची टीका

मुंबई | आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांना हुलकावणी देत एक दिवस आधीच मुंबईत दाखल झाले आहेत. “हा अतिशय मूर्खपणा असून कोणते मुद्दे घ्याचे यांचे त्यांना भान राणा दाम्पत्यांना राहिले नाही. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी हे सर्व प्रकार सुरू आहे,” अशी टीका शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यांवर केली आहे. राणा दाम्पत्य आज (२२ एप्रिल) विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत. राणा दाम्पत्य उद्या (२२ एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थाना समोर हनुमान चालिसाचे पठण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बच्चू कडू म्हणाले, “हा अतिशय मूर्खपणा असून कोणते मुद्दे घ्याचे यांचे त्यांना भान राणा दाम्पत्यांना राहिले नाही. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी हे सर्व प्रकार सुरू आहे. सामान्य माणसाशी संबंध नसलेले मुद्दे घेऊन त्यांचा अपमान करण्याच्या सोयीने ते जात आहेत. या उलड निवडून येतात तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतला. आणि आता वेगळ्या विचारधारेचा पाठिंबा घेत आहेत, असा टोला ही त्यांनी एपबी माझाशी बोलताना राणा दाम्पत्यांना लागवला आहे.

 मातोश्रीकडे वाकड्या नजरेने पाहाल तर शिवसैनिक सोडणार नाही – किशोरी पेडणेकर

अमरावतीत पोलिसांनी राणा दाम्पत्यांना रोखण्याआधीच ते मुंबईत दाखल झाले आहेत. रणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिक आक्रमक आहेत. मुंबईतील नंदगिरी गेस्ट हाऊसवर राणा दाम्पत्यांना शोधासाठी पोलीस दाखल झाले असून नंदगिरी गेस्ट हाऊसबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. मातोश्रीकडे वाकड्या नजरेने पाहाल तर शिवसैनिक सोडणार नाही. राणा दाम्पत्य मुंबई अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत प्राण्यांच्या मृत्यूनंतर दफनासाठी विशेष व्यवस्था करण्याबाबत सकारात्मक! – जितेंद्र आव्हाड

Aprna

राज्यातील एका मंत्र्याची आज विकेट पडणार ! चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा

News Desk

परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातील सचिन वाझे कोण? भाजपचा सवाल!

News Desk