HW News Marathi
महाराष्ट्र

राणा दाम्पत्यांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, संजय पांडेंची केली तक्रार

मुंबई | आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान नवनीत राणा यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. राणा दाम्पत्य हे महाविकासआघाडी सरकारची तक्रार करण्यासाठी आज (९ मे) दिल्लीला गेले असून  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आणि गृहसचिव यांची भेट घेऊन ठाकरे सरकारने त्यांच्यावर केलेल्या अत्याचारची तक्रार करणार आहे. लोकसभा अध्यक्षांची भेट झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला

नवनीत राणा म्हणाल्या, “अध्यक्षांची मी भेट घेतली असून माझ्यासोबत जे झाले ते त्यांना सांगितले. आणि लोकसभा अध्यक्षांनी देखील सर्व घटना जाणून घेतली. जेव्हा मी जेलमध्ये, जेलच्या आणि बाहेर जे घडले ते सर्व सविस्तर माहिती मी लोकसभा अध्यक्षांना दिली. लोकसभा अध्यक्ष मला नक्की न्याय देतील, असा विश्वास नवनीत राणा यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. २३ तारखेला माझा जबाब नोंदवण्यात येणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे त्यांच्याविरोधात आणि त्यांनी आदेश दिल्यानंतर त्यांनी चुकीची कारवाई केली. हा सर्व घटनाक्रम मी दिला आहे. जर ते सर्व दोषी आढळले तर त्यांच्यावर योग्यती कारवाई होईल.”

लीलावती रुग्णालयातील व्हायरल फोटोसंदर्भात नवनीत राणांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर नवनीत राणा म्हणाले, “माझ्या तब्यातीची जर कोणा एवढी काळीजी असेल तर त्यांनी वैयक्तिक त्या सर्वांनी माझ्या घरात येवून त्यांनी विचारपूस करावी. मला कसला त्रास आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची रिपोर्ट दाखवावे. महिलांचा रिपोर्ट विचारण्यासारखे कृत्य करू नका, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पदाचा मान ठेवावा.” 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवनिर्वाचित आमदार जयश्री जाधव यांनी मंत्रालयात जावून घेतली उपमुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

Aprna

‘या’ कारणासाठी १४ एप्रिलला संजय राऊत बेळगावला जाणार

News Desk

… शरद पवारांनी पूर्ण सत्य सांगावं; गिरीश महाजनांचा गंभीर आरोप

Aprna