Site icon HW News Marathi

कामगारांना निकृष्ट दर्जाचे अन्ना दिल्याने संतोष बांगरांनी चक्क व्यवस्थापकाच्या लगावली कानशिलात

शिवशंकर निरगुडे | हिंगोली येथील कामगार विभागाच्या मध्यान भोजन योजनेतील गैरप्रकाराचा आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी केला भांडाफोड बांधकाम कामगारांना निकृष्ट दर्जाचे जेवन दिल्याने व्यवस्थापकाच्य कानशिलात लगावली. हिंगोली शहरात जिल्हा भरात बांधकाम कामगारासाठी खराब झालेल्या पोळ्या करपलेलाभात अन निकृष्ट दर्जाचे वरण व भाजी पाहून आमदार संतोष बांगर संतापले आज (15 ऑगस्ट)  दुपारी त्यांनी औद्योगिक वसाहती मध्ये जाऊन कंपनीच्या व्यवस्थाकाच्या कानाखाली लगवली व कामगारांच्या आरोग्याशी खेळू नका असा सज्जड दमही त्यांनी दिला.

 

या संदर्भात येत होत्या अनेक तक्रारी

हिंगोली जिल्ह्यातील बांधकाम कामावर असलेल्या सुमारे 25 हजार पेक्षा अधिक कामगारांना मध्यंतरी भोजन दिले जाते त्यासाठीचे कंत्राट मुंबई येथील गुनिना कंपनीला देण्यात आले आहे त्यासाठी कंपनीला एका ठाणी साठी 67 रुपये दिले जातात मात्र यामध्ये कंपनीने दिलेल्या मेन्युनुसार भोजन पुरवणे आवश्यक आहे मात्र मागील काही दिवसा पासून या भोजनाबाबत वारंवार तक्रारी येऊ लागल्या होत्या आज आमदार संतोष बांगर यांनी दुपारच्या सुमारास कंपनीच्या औद्योगिक वसाहती मध्ये असलेल्या कार्यालयास व भोजनाच्या कक्षात भेट दिली तेथील सर्व प्रकार पाहून आमदार संतोष बांगर चांगलेच संतापले त्या ठिकाणी करपलेल्या पोळ्या भात देखिल योग्य पध्दतीने शिजलेला नव्हता डाळीमध्ये पाणीच जास्त होते तर या प्रकारानंतर आमदारांनी तेथील व्यवस्थापनकडे चौकशी केली असता त्याने दररोजचा मेन्यु सांगितला मात्र आज त्या मेन्यु नुसार काहीच भोजन तयार केले नव्हते तर निकृष्ट दर्जाचे भोजन दिसल्याने आमदार संतोष बांगर यांनी येथील व्यवस्थाकाच्या कानाखाली लगावली आमदार संतोष बांगर हें नेहमीच त्यांच्या या अश्या कामगिरी मुळे चर्चेत असतात .

लगेच मालकाशी दूरध्वनी वरून संपर्क करून कानऊघाडनी

कंपनीच्या मालकाशी दूरध्वनी वरून संपर्क करून त्याचीहि चांगलीच कान उघडनी केली कामगारांना निकृष्ट दर्जाचे भोजन देऊन त्यांच्या आरोग्याशी का खेळताय प्रशासनाची शासकीय योजना चांगल्या पध्दतीने राबवा अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा ईशारा आमदार बांगर यांनी दिला आहे त्यानंतर हा प्रकार कामगार अधिकारी टी .ई कराड यांच्या कानावरति घातला या वेळी युवासेनेचे जिल्हा प्रमूख राम कदम जिल्हा परिषद माजी सभापती फकीरराव मुंडे यांची उपस्थितीत होती

Exit mobile version