HW News Marathi
महाराष्ट्र

साताऱ्यात ‘नारळफोड्या गॅंग’; शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर टीका

मुंबई। साताऱ्यात नारळफोड्या गँग चा सुळसुळाट झाला आहे, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना नाव न घेता लगावला आहे. ही नारळ फोडणारी गँग जी कामे मंजूर झाली आहेत. या कामांची नारळ फोडण्यासाठी ही मंडळी पुढे असताता, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “सातारा गेल्या वीस वर्षात पाण्यापासून वंचित असेल असे त्यांचे म्हणणे असेल तर त्यावेळी तेच खासदार होते. आणि युतीच्या काळात ते मंत्री होते. त्याचबरोबर शाहूपुरी ग्रामपंचायत त्याच्याकडे असून शाहूपुरी जनतेला पाण्यापासून कोणी वंचित ठेवले, याचा आधी खुलासा करावा, असा थेट सवाल शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी उदयनराजे भोसलेंना केला आहे.
सातारा शहराची हद्दवाढीचा निर्णय यापूर्वी झाला असता, पण, आडमुठ्या भूमिकेमुळे दोन पुढे ढकलेली. परंतु आता पालिका निवडणूक आल्यात ना मग मते तर पाहिजेत ना, म्हणून स्वत:चे अपयश लपवण्यासाठी दुसऱ्या टीका करण्याचे काम करू नको, असे शिवेंद्रसिंहराजे भोसलेंवर टीका केली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज ठाकरेंना जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा” – नवाब मलिक

News Desk

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ सुरुच!

News Desk

नवनीत राणा यांनी घेतला एक अनोखा निर्णय!

News Desk