HW News Marathi
महाराष्ट्र

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना अमित ठाकरेंनी दिली भेट

पुणे | संपूर्ण देशात कोरोना रोगाने थैमान घातलं आहे. हा रोग सगळ्यात घटक ठरला आहे, परंतु याहून घटक ठरलं ते म्हणजे बेरोजगारी. याच बेरोजगारीला वैतागून, परीक्षेत उत्तीर्ण होऊन देखील नोकरी न मिळाल्याने पुण्याच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर नावाच्या तरुणाने पुण्यात आत्महत्या केली होती. स्वप्नीलच्या कुटुंबीयांचा सांत्वन करण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे यांनी त्याच्या कुटुंबियांना भेट दिली.

अमित ठाकरेंची घरच्यांच्या भेट

बेरोजगारीला वैतागून जीव गमावलेल्या स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना मनसे नेते अमित ठाकरे यांनी भेट दिली याची माहिती त्यांनी फेसबुक पोस्ट द्वारे कळवलं . अमित ठाकरे मुंबईहून सकाळी 7 वाजता पुण्याकडे निघाले. स्वप्निल लोणकरने 29 जून रोजी पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट लिहून “स्वप्नीलच्या दुर्दैवी घटनेतून महाराष्ट्र लोकसेवा आयोग योग्य तो बोध घेईल आणि आपला ‘दिरंगाईचा खेळ’ कायमचा थांबवेल” अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानंतर आता अमित ठाकरे स्वप्नीलच्या आई-वडिलांच्या सांत्वनासाठी पुण्याला जात आहेत. स्वप्निलला न्याय देण्याची मागणी करत काल नवी मुंबईत मनसेने शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वात आंदोलनही केले होते.

स्वप्निलच्या आत्महत्येचा कारण काय?

एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महापालिकेच्या निवडणुका २ वर्षे पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव, आशिष शेलारांचा गंभीर आरोप

News Desk

“जेव्हा कल्याणराव परत साहेबांकडे जायला लागले तेव्हा भाजपच्या पोटात दुखायला लागलं”

News Desk

महाअधिवेशनात अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड

swarit