HW News Marathi
महाराष्ट्र

जाणून घ्या… राज ठाकरेंनी ‘भोंग्यां’संदर्भात लिहिलेल्या पत्रातून मनसैनिकांना नेमके काय सांगितले

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याचा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. राज ठाकरेंनी भोंग्यासंदर्भात मनसैनिकांना आज (२ जून) एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून मनसैनिकाना सूचना दिल्या आहे की “आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा,” असे आदेश राज ठाकरेंनी पत्रातून दिले आहे. 

राज ठाकरेंनी म्हटले, “माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय़ आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा.”

राज ठाकरेंनी पत्रात नेमके काय म्हटले

माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो,

मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय़ आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा.

तुम्ही एकच करायचं आहे – माझं पत्र तुम्ही राहात्या परिसरातील घराघरात स्वत: नेऊन द्यायचं आहे. कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही.

मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या 12 महिलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र जसंच्या तसं!

News Desk

शरद पवार ते अनिल देशमुख ! महाविकासआघाडीच्या या नेत्यांची केलीय Ed, CBI ने कोंडी

swarit

भाजपच्या कोअर कमिटीला अमित शाहांचे मार्गदर्शन

News Desk