HW News Marathi
महाराष्ट्र

कट्टर शिवसैनिक ते मनसे जिल्हा प्रमुख प्रकाश कौडगे यांचे निधन

नांदेड | एकीकडे राज्यात कोरोनामुळे परिस्थिती भयावह होत असताना दुसरीकडे अनेक जणांचे प्राण कोरोनामुळे किंवा अन्य कारणांमुळे जात आहेत. मनसेचे नांदेडचे जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. हैद्राबादमधील रुग्णालयात त्यांनी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीर्घ काळ कौडगे यांनी शिवसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख पद भूषवले होते. तर काही महिन्यांपूर्वीच त्यांनी मनसेत प्रवेश केला होता.

कट्टर शिवसैनिक अशी प्रकाश कौडगे यांनी सुरुवातीच्या काळात नांदेडमध्ये ओळख होती. मात्र, प्रकाश कौडगे यांनी ऐन विधानसभा निवडणुक तोंडाशी आली असताना शिवसेनेलाराम राम राम केला होता. त्यानंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यांच्या मनसेप्रवेशामुळे नांदेडमध्ये मनसेची ताकद वाढल्याचंही बोललं जात होतं.

प्रकाश कौडगे यांनी ३१ डिसेंबर २०२०ला मनसेत प्रवेश केला होता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कौडगे यांचा अधिकृत पक्षप्रवेश झाला होता. पक्ष प्रवेशासोबतच राज ठाकरे यांनी कौडगे यांच्यावर मनसेच्या नांदेड जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती.

कोण होते प्रकाश कौडगे ?

नांदेडच्या सामाजिक आणि राजकीय पातळीवर प्रकाश कौडगे यांचा चांगला दबदबा होता. प्रकाश कौडगे शिवसेनेचा मोठा चेहरा म्हणून ज्ञात होते. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवसेना पक्षाकडून तिकीट मिळाले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या प्रकाश कौडगे यांनी दुसरा मार्ग अवलंबत अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता. त्यांच्या या बंडखोरीचा बराच फटका शिवसेनेला बसला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हॉटेल, बार, उपहारगृहासाठी राज्य सरकारकडून नियमावली जारी!

News Desk

दिवाळी दिवशी शासनाच्या नावाने शिमगा

News Desk

TET Exam : पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक

News Desk