HW News Marathi
महाराष्ट्र

ST कर्मचाऱ्यांसोबत अरेरावीची भाषा करणे योग्य नाही; राज ठाकरेंची सरकारवर टीका

मुंबई | “एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याची गरज असून कर्मचाऱ्यांसोबत अरेरावीची भाषा करणे योग्य नाही. जर एक लाख कर्मचारी अंगावर आले तर काय कराल?,” असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केला आहे. राज ठाकरे पुढे म्हणाले, ” एसटी कर्मचाऱ्यांना चार-चार महिने पगार मिळत नाही. जे लोकांच्या घरी दिवसाला किंवा दोन दिवसाला भ्रष्टाचारातून पैसे घरी पोहोचले नाहीत तर त्यांचा जीव कासावीस होतो. एसटी कर्मचाऱ्यांना चार-चार महिने पगार नाही?, त्यांची दिवाळी विनापगार गेली. एसटी कर्मचाऱ्यांशी अरेरावीची, कायद्याची भाषा बोलू नये, हे योग्य नसल्याचे राज ठाकरेंनी आज (१३ डिसेंबर) नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषद बोलत होते.

दरम्यान, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एसटी कर्मचाऱ्यासंदर्भात पत्र लिहिले असल्याची माहिती राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून दिली. राज ठाकरे पुढे म्हणाले, “एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्याऐवजी एखादी चांगली मॅनेजमेंट कंपनी का नेमत नाही?, तसे सरकारला करायचे नाही. फक्त कर्मचाऱ्यांना उपदेशाचे डोस देणे बरोबर नाही. त्याचबरोबर एसटी महामंडळातील भ्रष्टाचार बंद झाल्याशिवाय कर्मचाऱ्यांना काही मिळणार नाही,” असे राज ठाकरे म्हणाले

जनता सर्वच गोष्टी गांभीर्याने घेत नाही

म्हाडाच्या सर्व परीक्षा रद्दबाबत राज ठाकरेंना प्रश्न विचरल्यावर राज ठाकरे म्हणाले, “जनता सर्वच गोष्टी गांभीर्याने घेत नाही. काही काळापुरते जनता चिडवायचे आणि निवडणुकीच्या वेळी मतदान मात्र भलत्याच विषयांवर लोक मतदान करतात. मग तुम्ही तुमचा राग कधी व्यक्त करणार?,” अस उलट सवाल जनतेला केला आहे.

सरकारमधील लोकांनाच कोरोना नियम नीट समजले नाहीत

सरकारमधील लोकांनाच कोरोना नियम नीट समजत नाही. कोरोना नियमांध्ये एकाला सूट दिली तर दुसऱ्याला सूट दिली नाही. तर दुसऱ्याबाजुला थिएटरमध्ये मास्क लावायचा नाही. तर एक खुर्ची सोडून बसायचे. मग हे सर्व नियम रेस्टॉरेंटला का लागू नाही?, असा सवाल उपस्थित करून सरकारवर टीका केली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीने केली ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ दौर्‍याची घोषणा

News Desk

राज ठाकरे यांचा राज्यपाल कोश्यारींना इशारा, मराठी माणसाला डिवचू नका!

News Desk

“सचिन वाझे सरकारचा जावई आहे का?”, प्रविण दरेकरांचा सवाल

News Desk