HW News Marathi
महाराष्ट्र

अमेझॉन आणि फ्लिपकार्टने मराठी भाषेचा पर्याय आणा अन्यथा मनसे स्टाईलने सण साजरा होईल!

मुंबई | अमेझॉन आणि फ्लिपकार्टने ७ दिवसांमध्ये मराठी भाषेचा पर्याय त्यांच्या अ‍ॅपवर आणावा अन्यथा मनसे स्टाईल समाचार घेतला जाईल असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे. ज्या प्रमाणे या कंपन्यांनी दक्षिण भारतातल्या भाषांना प्राधान्य दिले आहे तिथे त्यांच्या भाषेत अ‍ॅप सुरु केलं तसंच अ‍ॅप महाराष्ट्रात मराठीत सुरु करावं अन्यथा या कंपनीचा दिवाळीचा सण मनसे स्टाइल साजरा होईल असा इशारा मनसेने दिला आहे. मनसे नेते अखिल चित्रे यांनी आज या दोन्ही कार्यालयांना भेट देत खडे बोलही सुनावले आहेत.

उद्यापासून म्हणजेच १६ ऑक्टोबरपासून अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्हीचा फेस्टिव्हल सेल सुरु होतो आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही अनेक उत्पादनांवर मोठी सूट दिली जाणार आहे. शिवाय या दोन्ही कंपन्यांनी वेगवेगळ्या डिल्सही समोर आणण्यास सुरुवात केली आहे. अ‍ॅमेझॉन १६ तारखेपासून प्राइम मेंबर्ससाठी तर १७ ऑक्टोबरपासून नॉन प्राइम मेंबर्ससाठी सेलचं आयोजन करणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉट तातडीने दूर करावेत! – मुख्यमंत्री

Aprna

आजारपणाला कंटाळून रुग्णाची आत्महत्या

News Desk

“हो राज्यपालांच्या सल्ल्यानेच राज ठाकरेंनी मला फोन केला”, शरद पवारांचे स्पष्टीकरण

News Desk