HW News Marathi
देश / विदेश

अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल

नवी दिल्ली | नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (दि.१८) दक्षिण अंदमानात दाखल झाले. दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण बंगाल उपसागराचा काही भाग आणि निकोबार बेट भाग मॉन्सूनने व्यापला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. अंदमान आणि निकोबारमध्ये मॉन्सूनचे आगमन २२ मे रोजी अपेक्षित आहे. असा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामानविषयक अंदाज देणार्‍या संस्थेने बांधला होता. मात्र त्यापूर्वीच मॉन्सून अंदमानात दाखल झाला आहे.

मॉन्सून ६ जून रोजी तो केरळमध्ये डेरेदाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला होता. स्कायमेट पाठोपाठ आयएमडीने केरळमधील यंदाच्या वर्षीची आगमनाची तारीख १५ मे रोजी जाहीर केली होती. दरम्यान स्कायमेटच्या अंदाजानुसार केरळमध्ये ४ जून रोजी मान्सून दाखल होणार असून आयएमडीच्या अंदाजानुसार तो आणखी दोन दिवस उशिराने दाखल होणार आहे. केरळमध्ये वेळापत्रकानुसार १ जून रोजी मान्सून दाखल होतो व महाराष्ट्रात ७ जून रोजी त्याचे आगमन होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुन्हा एकदा पीयूष गोयल यांच्या हाती रेल्वे मंत्री पदाचा कार्यभार

News Desk

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची लिफ्ट अवघ्या १५ दिवसात बंद

News Desk

मोठी बातमी! ‘प्रशांत किशोर यांनी मुख्य सल्लागार पदाचा दिला राजीनामा’

News Desk