मुंबई | कोरोनास्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी आता एक अत्यंत दिलासादायक बाब आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने आज (२४ ऑक्टोबर) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल ६ हजार ४१७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दुसरीकडे १० हजार ४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे, राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांचा एकूण आकडा आता १४ लाख ५५ हजार १०७ वर पोहोचला आहे. दरम्यान, या एकाच दिवसांत राज्यात १३७ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
राज्यात आज 6417 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 10004 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1455107 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 140194 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.78% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) October 24, 2020
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट हा ८८.७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृत्यूदर हा २.६३ टक्के इतका आहे. दुसरीकडे आतापर्यंत राज्यात एकूण ८५ लाख ४८ हजार ३६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील आतापर्यंतची एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १६ लाख ३८ हजार ९६१ वर पोहोचली आहे.तर सद्यस्थितीत राज्यात एकूण १ लाख ४० हजार १९४ अॅक्टिव्ह रुग्ण विविध रुग्णालयांत कोरोनावर उपचार घेत आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.