HW News Marathi
Covid-19

राज्यात नकोसा विक्रम ! आज 67 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरू आहे. राज्यात 24 तासांत वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्याने आज (17 एप्रिल) नकोसा विक्रम करत उच्चांक गाठला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज 67 हजार 123 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली. राज्यात फक्त 24 तासांत वाढलेला हा आकडा शासन आणि प्रशासनाला धडकी भरवणारा आहे.

आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, दिलासादायक बाब अशी की राज्यात आज नवीन 56 हजार 783 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण 30 लाख 61 हजार 174 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण 6 लाख 47 हजार 933 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.18% झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लवकरात लवकर वाहतूक चालू करा नाही तर पुन्हा आंदोलन करू, प्रकाश आंबेडकरांचा इशारा

swarit

पुढच्या महिन्यात एका दिवसात ४ ते ५ लाख कोरोना रुग्ण येण्याचा अंदाज..?

News Desk

देशात गेल्या २४ तासांत ६१ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले 

News Desk