HW News Marathi
महाराष्ट्र

रक्ताच्या बाटल्या फोडून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

उसाला योग्य भाव मिळावा यासाठी सहकारमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन, आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी केली अटक

सोलापूर : उसाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी आंदोलनादरम्यान प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वत: च्या अंगावर रक्ताच्या बाटल्या फोडल्या. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घराबाहेर हे उग्र आंदोलन करण्यात आले. यापुर्वीही देशमुख यांच्या घराबाहेर शेतकरी संघटनांनी आंदोलनं केली होती. या आंदोलनानंतर सुभाष देशमुख यांच्या घराला पोलीस संरक्षण देण्यात आले होते. मात्र या सुरक्षाव्यवस्थेला बगल देत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले आहे. सहकारमंत्र्यांच्या घराबाहेर रक्तदान शिबिराचे आयोजन करुन आंदोलनाचा इशारा प्रहार कडून देण्यात आला होता. मात्र घराला असलेल्या पोलीस संरक्षणामुळे कार्यकर्त्यांना तसे करता आले नाही. तेव्हा सहकारमंत्र्यांच्या घरापर्यत अम्ब्युलन्समध्ये लपून हे कार्यकर्ते आले. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी रक्ताच्या बाटल्या फोडत सरकारचा निषेध केला. या आंदोलनानंतर परिसरात रक्ताचा सडा पाहायला मिळाला. अखेर अथक प्रयत्नांनंतर आंदोलकांना ताब्यात घेत पोलिसांनी अटक केली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आज ‘स्पेशल 26’चा धमाका”, नवाब मलिकांना ‘एनसीबी’च्याच अधिकाऱ्याकडून आला लिफाफा

News Desk

दिल्ली-पुणे विमानात कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण, पुण्यात उपचार सुरु

swarit

कॉम्प्युटर हॅक होऊ शकतात, तर ईव्हीएम का नाही !

News Desk