HW News Marathi
महाराष्ट्र

पुतळ्याऐवजी युवक युवतींसाठी सैनिक शाळा सुरु करा खासदार इम्तियाझ जलील यांची मागणी

औरंगाबाद | शहरातील कॅनॉट परिसरात एक लाख रुपयांचा महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यात येत आहे. तर खासदार इम्तियाझ जलील यांनी पुतळा उभारण्यास विरोध केला आहे. जलील यांनी म्हटलं की पुतळा उभारण्यापेक्षा आणि त्यावर एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा शहरामध्ये युवक युवतींसाठी सैनिक शाळा सुरु करा, अशी मागणी इम्तियाझ जलील यांनी केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई तसेच जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण आणि मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे लेखी पत्राद्वारे खासदार जलील यांनी ही मागणी केली आहे. मागील महिन्यात पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार अतुल सावे आणि अंबादास दानवे यांनी सिडको कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप पुतळा उभारण्याच्या कामास सुरुवात करण्याची मागणी केली होती. या बैठकीतच खासदार इम्तियाज जलील यांनी पुतळा उभारणीला विरोध केला होता. तर याच निधीतून ग्रामीण भागातील युवक व युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिकी शाळा सुरु करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यासंबंधीचे पत्र आज (२२ जानेवारी) त्यांनी सादर केले आहेत.

इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई, जिल्हाधिकारी व मनपा प्रशासक यांना दिलेल्या पत्रात असे नमूद केले की, महाराणा प्रताप उदयपूर, मेवाड येथील शिशोदिया घराण्याचे महान राजा होते. त्यांच्या शौर्यामुळे आणि दृढ निश्चयामुळे त्यांचे नाव इतिहासाच्या पानावर अजरामर झाले. ते लहानपणापासूनच शूर, निर्भय, स्वाभिमानी आणि स्वातंत्र्यप्रेमी होते. अनेक युध्दात त्यांनी पराक्रम गाजवून शत्रूंवर विजय प्राप्त केलेला आहे. अशा थोर, महान शुरवीर महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारुन काहीही साध्य होणार नाही. महाराणा प्रताप यांच्या प्रती खरा आदर व सन्मान सैनिकी शाळाच असेल. कारण त्यांच्यापासून प्रेरणा घेवून ग्रामीण भागातील युवक व युवती सैनिक शाळामधून देश संरक्षणासाठी प्रशिक्षण घेतील. सदर सैनिकी शाळांमधून सक्षम आणि प्रशिक्षित लष्करी अधिकारी घडविण्याचे काम केले जाईल. सैनिक शाळेमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना लष्कर, हवाई दल आणि नौदलात नोकरी उपलब्ध होईलच, तसेच विविध इतर शासकीय आणि खाजगी क्षेत्रातसुध्दा रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे जलील यांनी पत्रात नमूद केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राज ठाकरेंच्या वक्तव्याला चंद्रकांत पाटलांचा दुजोरा!’

Jui Jadhav

बंगालमध्ये ममतांच्या विजयामागे शरद पवारांचा अदृश्य हात,राष्ट्रवादीचा दावा !

News Desk

क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षिस रकमेत पाचपट वाढ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna