HW News Marathi
महाराष्ट्र

खासदार नवनीत राणांनीं घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट!

नवी दिल्ली। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी भेट घेतली, या भेटीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर देखिल चर्चा करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात आलेला महापूर, अतीवृष्टी मुळे प्रचंड नुकसान झाल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले व केंद्राने महाराष्ट्रातील पुरपीडितांना भरीव मदत दयावी अशी मागणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी ही मागणी केली.

तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असते

महाराष्ट्राच्या या संकटसमयी अमितजी शाह यांनी तातडीने केंद्रातर्फे एन.डी.आर.एफ. चे बचाव पथक पाठविले ज्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचविले व केंद्राने तात्काळ 700 कोटींची मदत राज्याला दिली याबद्दल खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांनी अमित शाह यांचे आभार मानले.जर एन.डी.आर.एफ ची टीम वेळेवर पोहोचली नसती तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असते त्यामळे गृहमंत्रालयाने जी तातडीची पाऊले उचलली ते मदतकार्यात पूरक ठरल्याचेही खासदार नवनीत राणा यांनी नमूद केले.

शेतकरी-शेतमजूर,भागधारक यांची फसवणूक होऊ नये

अमित शाह यांना सहकार खाते मिळल्याबद्दल खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी त्यांचे अभिनंदन केले, सहकारातील स्वाहाकार नष्ट करून सहकाराच्या नावावर स्वतःची दुकानदारी चालवून शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या संधीसाधू सहकार सम्राटांना धडा शिकवावा व सर्वसामान्य शेतकरी-शेतमजूर,भागधारक यांची फसवणूक होऊ नये तसेच शेतकऱ्यांना सहकार क्षेत्राचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी सहकार खात्याचे सहज-सुलभ व सरळ धोरण निर्माण करण्याची गरज असल्याचे व अमित शाह यांनी यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंतीही खासदार सौ नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी केली.

महाराष्ट्रातील जनतेला न्याय दयावा

महाराष्ट्रातील आघाडी सरकार हे सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत असून केंद्राने यात लक्ष घालून महाराष्ट्रातील जनतेला न्याय दयावा अशी मागणीही खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी यावेळी केली.केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी राणा दाम्पत्याचे म्हणणे शांततेने ऐकून घेऊन यावर गांभीर्याने विचार करून सकारात्मक पाऊले उचलण्याचे अभिवचन खासदार नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांना दिले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंच ‘ते’ व्यंगचित्र खरं ठरल, महाराष्ट्रात दहशदवाद्यांचा तळ बनतोय

News Desk

आधी फडणवीस, आता शेलार म्हणाले विमानतळाच्या उद्घाटनला मुख्यमंत्र्यांनी यावं!

News Desk

#CoronaVirus : मी मिसेस मुख्यमंत्र्यांचे ऐकतो, तुम्ही होम मिनिस्टरचे ऐका, मुख्यमंत्र्यांचा सल्ला

swarit