HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील लॉकडाऊन विरोधात खासदार उदयनराजेंचं ‘भीख मांगो’आंदोलन

सातारा | राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या भूमिकेवरुन भाजप खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. सरकारच्या लॉकडाऊन विरोधात खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (शनिवार)दुपारी पोवाईनाका येथे आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत त्यासमोरील झाडाखाली पोती टाकून बसत थाळी ठेवून भीक मागो आंदोलन केले. यावेळी उदयनराजे यांनी सचिन वाझे प्रकरणासह इतर सर्वच विषयांवर राज्यसरकारवर टीका केली. या आंदोलनामुळे साताऱ्यातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

उदयनराजे यांनी या अगोदर देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. “संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून मुंबई-पुण्यासारख्या शहरातील रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांना छोटे व्यावसायिकांसह विविध क्षेत्रातून जोरदार विरोध होत आहे. कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्य माणसांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. जर लॅाकडाऊन सारखी परिस्थिती कायम राहणार असेल तर या दरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करून जनतेला किमान दिलासा द्यावा. अन्यथा जनतेत उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा उदयनराजे यांनी दिला होता.

उदयनराजे भोसले यांनी लॉकडाऊनला यापूर्वीच पूर्णपणे विरोध दर्शविला होता. व्यापारी असतो तर जग इकडे तिकडे झाले असते तरी मी दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही, असे उदयनराजे भोसले यांनी ठणकावून सांगितले होते. सध्या वातावरणात अनेक व्हायरस आहेत. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. लोकांनी पहिल्या लॉकडाऊनवेळी ऐकले.

आता लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. व्यापाऱ्यांनी कामगारांचे पगार कसे भागवायचे? सणासुदीचे दिवस असल्यामुळे व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला आहे. उद्या बँका हप्ते भरण्यासाठी व्यापाऱ्यांच्या मागे लागतील. त्यामुळे दुकानातील कामगारांना लस द्यावी. कामगारांना लस देऊनही दुकाने उघडण्यास परवानगी मिळत नसेल तर व्यापारी कसे ऐकणार, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एका संघर्षमय जीवनाचा अंत झाला,घरची परिस्थिती हलाखीची असतानाही बँकेची परीक्षा पास झाली, डेंग्यूने तरुणीचा जीव घेतला.:

News Desk

आज वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त बैठक !

News Desk

पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या; मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगामाचा आढावा

Aprna