HW News Marathi
महाराष्ट्र

MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर, १४ मार्चला राज्यसेवा पूर्व परीक्षा

मुंबई | कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे अनेक परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. काही परीक्षा तात्पुरत्या स्थगित कऱण्यात आल्या होता. CBSE बोर्डानं आपल्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्यानंतर आता राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तारखा देखील प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आला होत्या. मात्र आता राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर झाली असून विद्यार्थ्यांकडे अगदी कमी दिवस उरले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १४ मार्चला घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र अभियांत्रिकी पूर्व परीक्षा २७ मार्चला घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांकडे दोन महिन्यांचा अवधी उरला आहे. त्यामुळे या दोन महिन्यांत विद्यार्थ्यांनी कंबर कसून अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. मुख्य परीक्षांच्या तारखांची अद्यापही घोषणा करण्यात आली नाही मात्र साधारण ऑगस्ट महिन्यात मुख्य परीक्षा घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तीन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 च्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. नव्या वेळापत्रकाप्रमाणे या तीन परीक्षा मार्च आणि एप्रली महिन्यात घेण्यात येतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. यावेळी कोरोना नियमांची काळजी घेऊन परीक्षांचे आयोजन केले जाईल, असं एमपीएससीकडून कळवण्यात आलं आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्द सध्या न्यायप्रविष्ट असल्यानं MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती.त्यानंतर, ठाकरे सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मोठा निर्णय घेतला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते की परीक्षा पुढे ढकलल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला अपात्र ठरविण्यात येणार नाही. आता पूर्व परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून मुख्य परीक्षेची तारीख कधी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॉंग्रेस-भाजपमध्ये ट्विटरवर काव्यात्मक जुगलबंदी

News Desk

४ खासदार निवडून येतात त्यांना लोकनेता म्हणता, मग ३०३ खासदर निवडून देणाऱ्या मोदींना काय म्हणायचं? पडळकरांचा सवाल

News Desk

दारू पिऊन नदीत उतरलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

swarit