HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC परीक्षांची तारीख केली जाहीर

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या आणि काही रद्द करण्यात आल्या होत्या. एप्रिल, मे २०२० मध्ये होणाऱ्या MPSC च्या परीक्षा देखील कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या परीक्षा सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणार आहेत. राज्य सेवा पूर्वपरीक्षा २०२० आता १३ सप्टेंबर रोजी होणार आहे.

तर दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा आता ११ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे. तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आता १ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहेत.

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा संयुक्त परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलली होती. मात्र आता एमपीएससी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही”, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

Aprna

दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून वेगळा विचार सुरू !

News Desk

बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत!

News Desk