HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई उच्च न्यायालयाकडून किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

मुंबई | भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. सोमय्यांनी जर अटक झाल्यास त्यांना ५० हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे.  सत्र न्यायालयाने काल (१२ एप्रिल) किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. यानंतर सोमय्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यासंदर्भात आज (१३ एप्रिल) न्यायालयात सुनावणी पार पडली असून न्यायालयाने सोमय्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 

सोमय्यांनी सेव्ह आयएनएस विक्रांत बचावाच्या नावाखाली गोळा करण्यात आलेल्या पैशात घोटाळा केल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांनी केला आहे. यानंतर आयएनएस विक्रांतच्या मुद्यांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर हल्लाबोल केला. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्या पिता-पुत्रांनी पैसे गोळा करत मदत निधी उभा केला. यात सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात रक्कम जमा न करता पीएमपी बँकेच्या माध्यमातून मनी लाँन्ड्रिंग केल्या आरोप, राऊतांनी केला. परंतु, या निधीत घोटाळा झाल्याचा आरोप आरटीआयतून उघडकीस आले आहे. यानंतर माजी सैनिक बबन भोसले यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उजनीच्या हक्काच पाणी सोलापूरचंचं!भरणेंविरोधात शेतकऱ्याचं धरणात उतरून आंदोलन

News Desk

राज्यातील एकपडदा थिएटरचालकांचे खासदार सुप्रिया सुळेंना पत्र, पुन्हा थिएटर सुरु करण्याची केली मागणी

News Desk

ज्येष्ठ नागरिकांच्या कोविड-१९ चाचणी आणि उपचार सरकारी रुग्णालयातच होणार

swarit