HW News Marathi
महाराष्ट्र

राणा दाम्पत्य प्रकरण : ज्या लोकांनी गुन्हा केला, त्यांच्यावर मुंबई पोलिसांची कारवाई! – संजय पांडे

मुंबई | “ज्या ज्या लोकांनी गुन्हा केला आहे. त्यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल करत कारवाई केली आहे,” असे म्हणत मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या हनुमान चालिसा प्रकरणी झालेल्या कारवाईसंदर्भात फेसबुक लाईव्हमध्ये विचारलेल्या प्रश्नाचे त्यांनी उत्तर दिले आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून थेट मुंबईकरांशी संवाद साधला आहे. या माध्यमातून संजय पांडेंनी आज (२५ मे) मुंबईकरांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली आहे. यावेळी पांडेंनी वाहुतक विभागातील भ्रष्टाचार,  मुंबई पोलिसांनी विरोधी पक्षातल्या नेत्यांवर होणारी कारवाई, वाहतुकी नियम आदी मुद्यांवर मुंबईकरांच्या मनातील प्रश्नांचे उत्तर दिले. 

मुंबई पोलीस विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्या आणि नेत्यांवर मनाला वाटेल तसे कारवाई गुन्हे दाखल करतात का?, असा प्रश्न फेसबुकवर एका मुंबईकरांनी संजय पांडे विचारला होता. यावर संजय पांडे म्हणाले, “ही चुकीची बाब आहे. ज्या ज्या लोकांनी गुन्हा केला असेल, त्यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मग, हनुमान चालिसाचे प्रकरणामध्ये आपण पाहिले तर ४-५ गुन्हे सत्ताधारी पक्षावर झालेले आहेत. आणि हे सर्व भ्रम असून ही बातमी खरी नाही.” 

भ्रष्टाचार हा दोन्ही बाजुने होणार गुन्हा

वाहुतक विभाग भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी  आपल्या मार्फत उपाय योजना काय असतील?, या प्रश्नावर बोलताना पांडे म्हणाले, “सर्व लोक म्हणतात की भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार हा दोन्ही बाजुने होणार गुन्हा आहे. आपण जर पैसे दिले नाही तर कोणी पैसे घेऊ शकत नाही. आमचे पोलीस सुद्धा तुमच्यापैकीच एक आहे. काही लोक द्याला तयार आहे तर काही लोक घ्याला तयार आहे. नागरिकांनी मी एकच गोष्टी सांगू इच्छितो की, पैसे देणे हा कायद्याने गुन्हा आहे. तर तुम्ही या कायद्यात सहभागी होऊ नका. तेव्हाच भ्रष्टाचार थांबू शकतो, असे आवाहन त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांना केले आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Covid-19 : महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर; आरोग्यमंत्र्यांचा इशारा

News Desk

“मुंबई महापालिकेत आदित्यसेनेची भ्रष्टाचाराची शृखंला सुरूच,” भाजपच्या आमदारचा आरोप

Aprna

मराठा आरक्षणामागे राजकीय षडयंत्र, अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

News Desk