HW News Marathi
महाराष्ट्र

राणा दाम्पत्याची एकाच FIR मध्ये सर्व कलम टाकण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई | आमदार रवी राणा आणि त्यांची पत्न खासदार नवनीत राणा यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. राणा दाम्पत्याची दुसरी एफआयआर रद्द करावी आणि सर्व कलम एकाच एफआयआरमध्ये टाकावी, ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने एकाच एफआयआरमध्ये सर्व कलम टाकण्याची राणा दाम्पत्यांची याचिका फेटाळून लावली आहे. इथून पुढे राणा दाम्पत्यांवर कारवाई करण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी ७२ आधी नोटीस द्यावे, असे आदेश न्यायालयने दिले आहे. 

राणा दाम्पत्यांना हनुमान चालिसावरून झालेल्या नाट्यानंतर पोलिसांनी काल (२३ एप्रिल) अटक केले होते. राणा दाम्पत्याना वांद्रे न्यायालयाने काल (२४ एप्रिल) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ एप्रिलला होणार असून जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा भायखळा कारागृहात तर रवी राणांचा आर्थर रोड कारागृहात मुक्काम असणार आहे. तातडीने जामीनावर सुनावणी घेण्यास वांद्रे न्यायालयाने नकार दिला आहे. आणि सरकारी पक्ष २७ एप्रिलला आमचे लेखी म्हणणे मांडण्याचा सांगितले आहे.

“न्यायालयाने नवनीत राणा यांना फटकारले आहे. न्यायालयाने म्हटले, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला विशेष अधिकार मिळतात. त्या अधिकाराचे तुम्ही भान राखायला हवे,” असे न्यायालयाने म्हटले. राणा दाम्पत्यानी अटकेसाठी पोलिसाना सहकार्य केले नाही. पोलिसाच्या कामात अडथळा आणल्याने दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सरकारी वकिल प्रदिप घरात यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. घरत पुढे म्हणाले, “नवनीत राणांनी पोलिसांशी हुज्जत घातली असून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आणि राणा दाम्पत्यानी अटकेसाठी पोलिसाना सहकार्य केले नाही.” 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२० लाखांचा बूस्टर डोस अर्थव्यवस्थेला दिला तरी अर्थव्यवस्था मंदावलेलीच, सामनातून मोदी सरकारवर टीका

News Desk

देशभरात गेल्या २४ तासांत ३२,९३७ नवे करोनाबाधित, सर्वाधिक केरळमधून!

News Desk

किरीट सोमय्या सोमवारी बॉम्ब टाकणार; ते दोन नेते कोण? तर्कवितर्कांना उधाण!

News Desk