HW News Marathi
महाराष्ट्र

नागपूर पदवीधर मतदार संघात काँग्रेसची आघाडी तर भाजपची पिछाडी!

नागपूर | राज्यात सकाळपासून पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान नागपूर पदवीधर मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीत त्यांना ११३९५ इतकी मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना ९०४६ इतकी मते तिसऱ्या फेरीत मिळाली आहेत. दरम्यान, सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेसचे अभिजीत वंजारी तिसऱ्या फेरीत देखील आघडीवर आहेत. आणि भाजप उमेदवार संदीप जोशी हे पिछाडीवर आहेत.

दरम्यान, अभिजीत वंजारी यांना पहिल्या फेरीत १२६१७ तर दुसऱ्या फेरीत ११४९७ इतकी मते मिळाली होती. आता एकूण मते ३५५०९ इतकी झाली आहेत. तर संदीप जोशी यांना पहिल्या फेरीत ७७६७ तर दुसऱ्या फेरीत ९०८५ इतकी मते मिळाली होती. एकूण मते २५८९८ इतकी झाली आहेत. तिसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी यांच्याकडे एकूण ९,६११ मतांची आघाडी आहे. वंजारी यांना प्रथम पसंतीक्रमाची एकूण ३५,५०९ मते मिळाली आहेत. तर भाजपचे संदीप जोशी यांना प्रथम पसंतीक्रमाची २५,८९८ मते मिळाली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या!

News Desk

‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात !

News Desk

जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेला आमचा पाठींबा – अजित पवार

News Desk