HW News Marathi
महाराष्ट्र

नागपुरात सेनेला मोठी गळती, ४० जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश….

नागपूर | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी संघटन बांधणीवर भर दिला. विशेष म्हणजे पूर्व नागपुरातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना त्यांनी विश्वासात घेऊन राष्ट्रवादीत आणले. महिनाभरापूर्वी सेनेचे वजनदार नेते व माजी महापौर शेखर सावरबांधे यांनीही सेनेतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादीत प्रवेश केला.

शनिवारी उशिरा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत नंदनवन येथील अक्षय भवनात पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शिवसेनेतील तब्बल चाळीस जणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीचा दुपट्टा देऊन त्यांचे स्वागत केले. शेखर सावरबांधे यांच्या पुढाकाराने या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी राज्य सरकारची जनहिताची कामे नागरिकांपर्यंत पोहोचवून पक्षबांधणीत योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी प्रफुल पटेल यांनी केले. यावेळी शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी राष्ट्रवादीत प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही दिली. राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने शिवसेनेच्या जिल्हा उपाध्यक्षा नीलम उमाठे, माजी नगरसेविका जयश्री जांभुळे, सेनेचे पूर्व नागपूरचे माजी विधानसभा संघटक प्रमोद मोटघरे, शिवसेनेचे माजी विभागप्रमुख संजय मोहरकर, युवासेनेचे जिल्हा समन्वयक शशिकांत ठाकरे, व्यावसायिक सोनू मैनानी, राजेश मेंढे, राजेश राजगिरे, राधेश्याम वाघ, रुपेंद्र नागपुरे यांच्यासह तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा समावेश आहे. कार्यक्रमात माजी मंत्री रमेश बंग, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ईश्वर बाळबुधे आदी उपस्थित होते.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विस्ताराचे धोरण अवलंबिले आहे. विशेष म्हणजे आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेलाच सुरुंग लावण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. माजी महापौर शेखर सावरबांधे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सेनेला चांगलीच गळती लागली असून शनिवारी ४० जणांनी शिवबंधन सोडून घड्याळ बांधले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी वडिलांचे स्मारक स्वत:च्या पैशांनी बांधले”

News Desk

अजित पवारांनी कोल्हापूर दौऱ्यात पूरस्थितीबाबत केल्या महत्त्वाच्या घोषणा…!

News Desk

पवारांचा महाराष्ट्रात प्रत्यक्ष हात असूनही राष्ट्रवादी पंढरपूर जिंकू शकली नाही !

News Desk