HW News Marathi
महाराष्ट्र

नोंदणी करण्यापासून लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत नागरिकांना मदत करा! : नाना पटोले

मुंबई | राज्यभरातील सर्व जिल्हा काँग्रेस काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात सुरु असलेल्या कोविड सहाय्यता मदत केंद्रामार्फेत नागरिकांना मदत केली जात असून त्या कार्याला गती द्यावी. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीसाठी नोंदणी करण्यापासून लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत गावोगावच्या नागरिकांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूर्ण मदत करावी असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, कोरोनाच्या दुस-या लाटेने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. रूग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढते आहे. ऑक्सिजन, वैद्यकीय उपकरणे, रेमडेसिवीर इंजेक्शन औषधे याचा तुटवडा संपूर्ण देशभरात आहे. राज्यही त्याला अपवाद नाही. केंद्र सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिका-यांच्या संपर्कात राहून लोकांना मदत मिळवून द्यावी.

काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरात रक्तदान शिबेरे आयोजित केली होती त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आवश्यकतेनुसार शिबिरांची संख्या वाढवली पाहिजे. गावोगावी जाऊन लसीकरणासाठी लोकांची नोंदणी करून लसीकरण केंद्रावर त्यांना लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मदत करावी असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा पुन्हा ताकदीने फडकेल!” नाना पटोले

News Desk

‘पुण्यासाठी काही सूट देता येईल का याबाबत चर्चा सुरु’, गृहमंत्र्यांची माहिती

News Desk

शरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेणार, सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार ?

News Desk