HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेड महापालिकेत काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल 

आत्ता पर्यंत ३३ जागांवर काँग्रेस आघाडीवर

– भाजपची केवळ २ जागांवर आघाडी

– एमआयएम फेक्टर चाललाच नाही

नादेड महापालिकेत काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल केली आहे. आत्ता पर्यंत हाती आलेल्या कला नुसार ८१ पैकी ३३ जागांवर काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. तर भाजप २ आणि शिवसेना २ जागांवर आघाडीवर आहे.

सुरूवातीचे कल पहता काँग्रेसने नांदेड महापालिकेत जोरदार मुसंडी मारली आहे. तर दुसरीकडे ही निवडणूक प्रतिष्ठेची करणाऱ्या भाजपची पिछेहाट झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूकी स्वबळावर लढवली होती. त्यांना अजूनही खाते उघडता आले नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना त्यांच्याच गडात चारीमुंड्या चित करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली होती. डझनभर मंत्री नांदेडमध्ये प्रचार सभा घेवून गेले. मात्र सध्याचे कल लक्षात घेता नांदेडकरांनी चव्हाण यांना साथ दिल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे या निवडणूकीत एमआयएम फँक्टर दिसला नाही. शिवसेनेची स्थितीही केवीलवाणी झाल्याचे दिसते. आता पर्यंत शिवसेनेला २ जागांवर आघाडी मिळवता आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा प्रचार करत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॅप्टन अमरिंदर सिंग लवकरच स्वतःचा नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत!

News Desk

सदाभाऊंचे मंत्रिपद कायम

News Desk

कृष्णा उपखोऱ्यातील गावे पुराच्या दृष्टीने संवेदनशील

News Desk