HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले का? ते हिंदू आहेत ना? – नारायण राणे

narayan rane

मुंबई | यंदाच्या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे आषाढी एकादशीच्या वारीचा सोहळा वेगळ्या पद्धतीने पार पडला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या शासकीय पुजेवरून्ही राजकारणात अनेक चर्चा सुरू झाल्या. मुख्यमंत्र्यांनी यंदाच्या वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढपूरात जाऊन वारकरी संप्रदायाचा अवमान केल्याची टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी सुरुवातीपासूनच   उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडी सरकारवर टीका करत होते.

कोरोना आणि त्यामुळं निर्माण झालेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी खुद्द पंढरपूरातील स्थानिकांनाही या दिवशी मंदिरप्रवेश नाकारण्यात आला. यावरच टीका करत राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली.

‘मुख्यमंत्री पंढरपूरात गेले. शासकीय महापूजेचा मान असतो त्यांचा. पण, यांनी काय केलं, दर्शन घेतलं का? विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायांना हात लावला का? गंध लावलं, हार घातला का? नैवेद्य घेतला का, हा तर वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. हे मुख्यमंत्री आहेत ना, हिंदू आहेत ना?’, या शब्दांत राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

पंढरपूरातील एकाही व्यक्तीला मंदिरात जाऊ दिले नाही, एकाही स्थानिक शिवसैनिकाला ते भेटले नाहीत ही बाब अधोरेखित करत, पिंजऱ्यातच करायची होती तर मग मातोश्रीवरच विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा करायची होती असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी मंदिरात गरम होते म्हणून कारमध्ये येऊन बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे तर, चार पावले पुढे असल्याचे म्हणत त्यांनाही खडे बोल सुनावले.

Related posts

#LokSabhaElections2019 : चौकीदार हे गरिबांचे नव्हे तर श्रीमंतांचे असतात !

News Desk

अण्णांचे उपोषण या प्रश्नांची उत्तरे देईल काय ?

News Desk

कल्याणमधून 7 नक्षवाद्याना अटक, भीमा कोरेगाव प्रकरणात सामिल?

Ramdas Pandewad