HW News Marathi
महाराष्ट्र

‘नारायण राणेंच्या दोन्ही मुलांना मारल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही’, सेनेच्या मंत्र्यांसमोरच इशारा!

बीड। ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बदल कोणी चुकीचे बोलत असेल तर आम्ही सहन करणारे शिवसैनिक नाहीत. त्यामुळे येत्या काळात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या दोनी मुलांना मारणार असण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी दिला.आज मंत्री संदीपन भुमरे यांच्या मार्गदर्शन खाली बीडच्या शासकीय विश्राम येते शिवसेनेची बैठक झाली. यावेळी, राज्याचे मंत्री संदीपान भुमरे यांच्यासमोरच गणेश वरेकर यांनी शिवसेनेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांवर आरोप केला. ‘जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी फक्त पैसे कमवण्यामध्येच व्यस्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात राणेंच्या विरोधी आंदोलनात पदाधिकारी उपस्थित नव्हते मात्र आम्ही उद्धव ठाकरेसाहेब यांची बदनामी सहन करणार नाहीत आणि येत्या काळात नारायण राणे यांच्या दोनी मुलांना मारणार असल्याचे वक्तव्य केले.

बीडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात अंतर्गत कुरबुर सुरू

या बैठकीमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सत्तेचा वाटा मिळत नाही. केला दोन वर्षात एकही नारळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उठला नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना जर शिवसेनेला काहीच मिळत नसेल तर दुर्दैव आहे, आता यासंदर्भात तुम्हीच काहीतरी करा असं देखील साकडं शिवसैनिकांनी संदीपान भुमरे यांना घातलं.बीडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात अंतर्गत कुरबुर सुरू असल्याचे दिसून येत आहे. एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर विकास कामे द्या, म्हणजे लोकांना विकास केला हे सांगता येईल, असं देखील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सांगितलं.

कुंडल्या आमच्याकडेही आहेत – राऊतांचा इशारा

खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना आणि नेत्यांची सगळी प्रकरणं मी हळूहळू बाहेर काढतो, असा उघड इशारा नारायण राणे यांनी दिला होता. त्यावर आम्ही सभ्यपणा पाळतोय, पण कुंडल्या आमच्याकडेही आहेत, आम्ही देखील संदूक उघडू शकतो हे लक्षात ठेवा, असं प्रत्युत्तर राऊतांनी राणेंना दिलं आहे. संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊतांचा नाशिक दौरा महत्त्वाचा आहे. आज शिवसेनेच्या कार्यक्रमात राऊतांनी राणेंचे अक्षरश: वाभाडे काढले तसंच जे वादळ उठलंय ते अद्याप संपलेलं नाही, असं म्हणत राणेंना एकप्रकारे इशाराच दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोठी बातमी! वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

News Desk

ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल- संजय राऊत

News Desk

अजित पवार अन् नवनिर्वाचित कृषिमंत्र्यांची एकमेकांवर स्तुतीसुमने

News Desk